breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : भाजपाचे संतोष लोंढे यांनी स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड

सर्वपक्षीय नगरसेवक-पदाधिकाऱ्यांकडून संतोष लोंढेंचा सत्कार

  • पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतीपदी शुक्रवारी नगरसेवक संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भालेकर यांनी अर्ज माघारी घेतली आहे. दरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवक-पदाधिकाऱ्यांनी लोंढेंचा सत्कार केला.

महापालिका भवनातील स्थायी समिती सभागृहात सभापतीपदाची निवड शुक्रवारी पार पडली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.

पीठासीन अधिकारी म्हणून रुबल अग्रवाल यांनी काम पाहिले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button