breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

सरकारकडून Android युजर्सना ‘क्रिटिकल वॉर्निंग’ जारी

Android : भारतातील मोबाईल धारक आणि त्यातही अँड्रॉईड युजर्सना इंटरनेट आणि व्हर्च्युअस दुनियेतील धोक्यापासून वाचवण्यासाठी इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पोंस टीमच्या वतीनं काही मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत. सरकारच्या वतीनं नुकताच मल्टीपल वल्नरबिलिटीचा खुलासा झाला असून, याचा अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीमला धोका असल्याचं सांगण्यात येत आहे.

या वल्नरबिलिटीच्या मदतीनं हॅकर्स अगदी सहजपणे तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती मिळवू शकतात. बँक खाते, ठेवी, आदिंवरही त्यांचा डोळा असू शकतो. यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार हल्ली जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये बँकेचा तपशील, ओटीपी, खासगी माहिती असते. हॅकर्स यावर डोळा ठेवत असून, तुमची महत्त्वाची माहिती, फोटो किंवा बँकेतील पैसेही बळकावण्याचा हेतू यातून उदभवतो.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा  

हॅकर्सपासून वाचण्यासाठी मोबाईल ओएसकडून वेळोवेळी येणाऱ्या सिक्योरिटी अपडेटवर लक्ष ठेवा. अनेकदा अनावधानानं आपण अपडेट्सकडे लक्ष देत नाही. पण, यावेळी ही चूक महागात पडू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button