ताज्या घडामोडीमुंबई

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; राज्यात पहिली विद्युत एसटी बस १ जूनपासून धावणार

मुंबई | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १ जूनला होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील तमाम प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पहिली एसटी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. याच मार्गावर पहिली विद्युत बस  अर्थात ‘शिवाई’ चालवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. एसटी गाड्यांचा तुटवडा कमी करण्यासाठी चालू वर्षाअखेरीस तीन हजार पर्यावरणपूरक गाड्या महामंडळात दाखल होणार आहेत.

सुट्ट्यांच्या काळामुळे प्रवासी गाड्यांना प्रचंड मागणी आहे. सध्या कर्मचारी आहेत, प्रवासी आहेत व गाड्या नाही. एसटीच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागात फेऱ्या पूर्णपणे सुरू झालेल्या नाही. याचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी महामंडळात सर्व विभाग नियंत्रकाची विशेष बैठक बोलावली होती. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतुकीचे नियोजन तातडीने करण्याच्या सूचना मंत्री परब यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

 

देशातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये पर्यावरणपूरक गाड्यांचा म्हणजेच विद्युत गाड्यांचा अधिकाधिक समावेश करावा, यासाठी केंद्र सरकारने ‘फेम’ योजना सुरू केलेली आहे. या योजनेनुसार विद्युत बससाठी केंद्राकडून सवलत देण्यात येते. केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेंतर्गत एसटी महामंडळाच्या ताफ्यात एक हजार विद्युत बस आणि दोन हजार सीएनजीवरील बस दाखल होणार आहेत. यातील १५० विद्युत गाड्यांचा पहिला टप्पा जूनमध्ये येईल, त्यानंतर वर्षाअखेर एकूण एक हजार विद्युत गाड्या दाखल होतील.

शहरी भागात सीएनजी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे मुंबई-पुणे-नाशिक आणि अन्य आंतरशहरी मार्गावर सीएनजी बस सुरू करण्यात येतील. ग्रामीण भागात डिझेलवर धावणाऱ्या बस सुरू राहतील. नव्या गाड्या दाखल झाल्यानंतर महामंडळातील गाड्यांचा तुटवडा कमी होईल आणि प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या उपलब्ध होईल, अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

६२ टक्क्यांचे भारमान ४० टक्क्यांपर्यंत घसरल्यानंतर भारमान वाढवण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टींचे नियोजन करावे, त्यासाठी पूर्वीचे पॅटर्न बदलावे, शाळांची बदलली वेळ लक्षात घेता शाळांच्या वेळेचे नियोजन करून बस सोडाव्यात, अशी सूचनाही मंत्री परब यांनी बैठकीत केली.

‘एसटी महामंडळात वर्षाअखेर एकूण एक हजार विद्युत बस दाखल होणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात १ जूनपर्यंत १५० गाड्या येण्याची शक्यता आहे. राज्यातील पहिली एसटी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. आता याच मार्गावर पहिली विद्युत बस अर्थात शिवाई चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे,’ असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button