breaking-newsTOP NewsUncategorizedटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

भारतीय महिलांसाठी एक आनंदवार्ता! 100 दिवसांत गर्भाशय कॅन्सरविरोधात आता लस होणार उपलब्ध

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भारतीय महिलांसाठी एक आनंदवार्ता आहे. आता महिलांना जीवघेण्या गर्भाशयाच्या कॅन्सरविरोधात पुढील वर्षी एक लस उपलब्ध होणार आहे. भारतात गर्भाशयाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहता या लसीचा आता महिलांना फायदा होणार आहे. पुढील वर्षी एप्रिल ते मे दरम्यान सर्व्हावॅक ही ह्यूम पॅपिलोमा व्हायरस लस उपलब्ध होईल, अशी माहिती कोरोना वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन के अरोडा यांनी दिली आहे.

या लसीबाबत डॉ. एन. के. अरोडा यांनी सांगितले की, या HPV लसीची किंमत देशातील इंटरनॅशनल मेडिकल ब्रँड लसीच्या तुलनेत दहा पट कमी असेल, त्यामुळे या लसीचा लाभ गरीबांना सहजरित्या होईल, भारतात 2 ते 3 कंपन्या गर्भाशयाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लस तयार करण्याच्या प्रक्रियेत आहेत. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आघाडीवर आहे. सीरमला लस प्राधिकरणाने परवानगी दिली असून ही लस 2023 मध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं.

भारतात गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे सर्वाधिक मृत्यू होतात. दरदिवसा भारतात कॅन्सरमुळे 95 ते 100 महिलांचा मृत्यू होतो. जागतिक पातळीवर दरवर्षी 80 हजारांहून अधिक प्रकरणं ही गर्भाशयाच्या कॅन्सरसंदर्भात आहेत. जगाच्या तुलनेत 25 टक्के रुग्ण एकट्या भारतात आहेत. तर दरवर्षातील गर्भायश कॅन्सरमुळे 1 लाख महिलांमधील 22 रुग्णांचा मृत्यू होतो. भारतीय महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या आजारांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

गर्भाशयाचा कॅन्सर या लसीद्वारे पूर्णपणे बरा होऊ शकतो. या कॅन्सरमुळे महिलांच्या शरीरात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस तयार होतो. त्याला रोखण्यासाठी ही लस फायदेशीर ठरणार आहे. वयाच्या 35 व्या वर्षांनंतर प्रत्येक महिलेने गर्भाशयाच्या कॅन्सरसंबंधीत नियमित चाचण्या करणे गरजेचे आहे जेणेकरून सुरुवातीच्या स्टेजमध्येच कॅन्सरचे निदान करता येते. ही तपासणी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात होते असं डॉ. अरोडा म्हणाले.

पुढील चार ते पात महिन्यात HPV लस निर्माण करत भारत या लसी उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत असेल. दरम्यान केंद्र सरकार लवकरचं राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण मोहिम राबवणार आहे. या लसींची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी म्हणजे 200 ते 400 रुपयांदरम्यान असणार आहे, असही डॉ. अरोडा म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button