breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन

ठाणे – महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. ठाणे शहरातील काही भागांतही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्णांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने कोरोनाचा उद्रेक झालेल्या भागांना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले असून कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी याठिकाणी आजपासून ३१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून हा लॉकडाऊन सुरुवातीच्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनप्रमाणेच कडक असणार आहे. तर हॉटस्पॉटबाहेरील भागांमध्ये राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत दिलेल्या आदेशांनुसार जनजीवन सुरू राहील.

कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने सरकारने टप्यापटप्याने लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरूवात केली होती. मात्र अनलॉक काळात मुंबई, पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शहरांमध्ये कोरोना संक्रमण वाढले आहे. ठाणे महापालिका हद्दीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आई नगर (कळवा), सूर्या नगर (विटावा), खरेगाव हेल्थ सेंटर, चेंदणी कोळीवाडा, श्रीनगर, हिरानंदानी इस्टेट, लोढा माजीवाडा, रुणवाल गार्डन सिटी (बालकुम), लोढा अमारा, शिवाजी नगर, दोस्ती विहार, हिरानंदानी मिडोज, पाटील वाडी, रुणवाल प्लाझा (कोरेस नक्षत्र), रुणवाल नगर (कोलबाद), रुस्तोमजी (वृंदावन) या १६ हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये आजपासून लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button