breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राहुल गांधी वीर सावरकरांच्या भूमीत येत आहेत, त्यांचं..’; संजय राऊतांचं विधान

मुंबई | काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे शहरात दाखल होत आहे. सध्या ही यात्रा दोंडाईचा येथे मुक्कामी आहे. दरम्यान आदिवासी बांधवांकडून राहुल गांधींच्या यात्रेचं जोरदार स्वागत केलं जातंय. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या सभेत उपस्थित राहणार आहेत असं ते म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधींचं स्वागत करण्यासाठी मी नाशिकमध्ये आलो आहे. राहुल गांधी यांचं स्वागत आम्ही करु. त्यांच्या यात्रेतही शिवसैनिक सहभागी होतील. आम्ही इथे यजमान आहोत त्यामुळे आम्ही राहुल गांधींच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. वीर सावकर यांच्या भूमित राहुल गांधी येत आहेत, त्यांचं स्वागत होतं आहे.

हेही वाचा      –      ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार 

खरं म्हणजे मनसेने मुंबईवर जे संकट येतं आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा केली पाहिजे. मुंबई गिळली जाते आहे, मराठी माणसावर रोज अन्याय होतो आहे. शिवसेना म्हणून आम्ही लढतो आहोत. तो विषय गंभीर आहेत. वीर सावरकर आमचा पंचप्राण आहेत. राहुल गांधी काय बोलतील याची चिंता करण्यापेक्षा मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेत का निघाले? त्याची चिंता केली पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी मनसेला टोला लगावला आहे.

नितीन गडकरी हे दिल्लीतले महत्त्वाचे नेते आहे. आम्ही त्याबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यात बालिश म्हणण्यासारखं काय? ते अन्याय सहन करत आहेत त्यामुळे ते बोललो होतो. वीर सावरकर हा विषय आमच्यासाठी आणि काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. त्या विषयावर राहुल गांधींनी आपलं मत मागच्या वेळी जे बोलले होते त्यानंतर काहीही बोलले नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे, तो नारा २०० पारपर्यंतच थांबेल अशी चर्चा आहे.अशोक चव्हाण यांना नांदेडच्या एका जागेसाठी राज्यसभा निवडणूक दिली आहे. त्यांच्या मनात भीती आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार मोठ्या फरकाने जिंकेल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button