breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे गुड मॉर्निंग

पनवेलमध्ये माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारांना आवाहन

पनवेल | प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. विद्यमान खासदारांच्या निष्क्रियपणाबद्दल नाराजीचा सूर हा यत्र तत्र सर्वत्र असा उमटत आहे. आता हवा खासदार नवा! अशी जनभावना मावळ लोकसभा मतदारसंघात उमटत आहे. याचा प्रत्यय मंगळवारी (दि.७) पनवेलमध्ये आला. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांनी मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या समोरील मशालीचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे विनंती यावेळी मतदारांना केली.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये १८९ पनवेल विधानसभा क्षेत्र निर्णायक समजले जाते. या ठिकाणी सत्ता सोपानावर झुलणाऱ्यांनी जनतेला गृहीत धरले आहे. जनसामान्यांसाठी जीवनावश्यक सेवासुविधा पुरवताना प्रशासनाला दमछाक होत आहे. लोकप्रतिनिधींचा कुठलाही स्वरूपाचा अंकुश प्रशासनावर नाही. विनंती, अर्ज, कामे, समस्या घेऊन गेलेल्या नागरिकांना विद्यमान खासदारांनी हे काम माझ्या अखात्यारित येत नाही, असे सांगत टोलावले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी प्रचारासाठी एक अनोखी क्लृप्ती वापरली. सकाळी लवकर उठून चालायला येणाऱ्या मतदारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुंदर प्रतिसाद मिळाला. संजोग वाघेरे पाटील यांच्या रूपाने नवा खासदार आणि जनतेची काम करणारा खासदार आम्हाला मिळेल, अशी नभावना येथे उमटून आली.

हेही वाचा     –     ‘अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचं मोठं विधान 

वडाळे तलाव हा पनवेलच्या शिरपेचातील मुकुटमणी समजला जातो. फार मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक सकाळी चालण्यासाठी येतात. विशेष म्हणजे यामध्ये समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश असतो. अबाल वृद्ध, महिला, तरुणाई यांची येथे रेलचेल असते. या साऱ्यांशी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी उपस्थित मतदारांनी व्यक्त करत महाविकास आघाडीला आणि संजोग वाघेरे पाटील यांना विजय करण्याचा निर्धार केला.

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल शहर चिटणीस नंदू भोईर, शेकाप पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा ठोकळ, माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे जॉर्ज, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा माधुरी गोसावी, शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, बाबू जाधव जॉन्सन जॉर्ज मंगेश अपराज, बी. पी. म्हात्रे, डी. बी. म्हात्रे, कविता ठाकूर, वैभव जोशी आदींची उपस्थिती होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button