ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिकन दुकानातील कामगाराचा प्रताप!

पिंपरी चिंचवड | चिकन विक्रीच्या दुकानात काम करणारा कामगार दुकानातील पैसे घेऊन पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी भैय्यावाडी, रहाटणी येथे घडली. इक्रामूल नाझीमुद्दीन शेख (वय 35, रा. साईसागर कॉलनी, रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. योगेश रामकृष्ण कनकधर (वय 34, रा. जयहिंद कॉलनी, काळेवाडी) यांनी गुरुवारी (दि. 9) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कनकधर यांचे भैय्यावाडी, रहाटणी येथे स्टार चिकन डेली फ्रेश नावाचे चिकन व अंडी विक्रीचे दुकान आहे. आरोपी इक्रामुल हा त्या दुकानात कामाला आहे. त्याने दुकानात जमा झालेले 58 हजार रुपये व मागील थकबाकी 13 हजार रुपये असा एकूण 71 हजार रुपये घेऊन पळून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

उघड्या दरवाजावाटे घरात येऊन लॅपटॉप व मोबाईल पळवला

उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप व मोबाइल फोन चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी हिंजवडी येथे उघडकीस आली. अवधूत प्रकाश नलावडे (वय 25, रा. साई व्हिला बिल्डींग, हिंजवडी) यांनी गुरुवारी (दि. 9) याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नलावडे यांच्या घराचा दरवाजा बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी सात वाजताच्या दरम्यान उघडा होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून लॅपटॉप व मोबाइल फोन असा एकूण 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button