breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई
Global Teacher Prize: मराठमोळ्या डिसले गुरुजींचे राज ठाकरेंकडून कौतूक
मुंबई । प्रतिनिधी
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मराठमोळे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची श्री. डिसले यांनी सदिच्छा भेट घेतली .
या वेळी राज यांनी डिसले आणि कुटुंबियांचे अभिनंदन केले व कुटुंबातील सदस्यांची आस्थेने चौकशी केली .
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, प्रदेश सरचिटणीस, शाडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, हरिभाऊ जाधव गुरुजी, प्रवीण देशमुख गुरुजी उपस्थित होते.