TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणे

ताथवडे-रावेत भागातील रस्त्यांच्या कामाला ‘गती’

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची मागणी; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे सकारात्मक आश्वासन

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील समाविष्ट गावे ताथवडे, रावेत आणि पुनावळे परिसरातील खराब झालेल्या रस्त्यांमुळे ऐन पावसाळ्यात या भागातील नागरिक, वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करावे , अशी मागणी भाजपा शहराध्‍यक्ष शंकर जगताप यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची बुधवारी महापालिका भवनात भेट घेतली. यावेळी माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेवक राजू दुर्गे, उद्योजक नवीन लायगुडे, बाळासाहेब करंजुले उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, ताथवडे, रावेत, पुनावळे या परिसरामध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. तातडीने खराब झालेले रस्ते दुरुस्त करून घ्यावेत तेसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करणे अपेक्षीत आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी खराब झालेल्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ताथवडे, पुनावळे आणि रावेतमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटला…
महापालिका हद्दीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून प्रतिवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, प्रशासनाने गतवर्षी नियमांमध्ये बदल केले. दहावी, बारावीच्या सीबीएसई माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव केल्याची भावना निर्माण झाली होती. यावर महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय द्यावा आणि शिष्यवृत्ती योजना सर्वांना लागू करावी, अशी मागणी शंकर जगताप यांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शिष्यवृत्तीचे समान वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ‘सीबीएसई’ माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.

ढोल-ताशा पथकांना निशुल्क परवानगी…
शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू झाले आहेत. ढोल-ताशा पथकांच्या परवानगीसाठी प्रशासनाकडून शुल्क आकारले जात होते. मात्र, शहरातील तरूण-तरुणी या पथकांमध्ये छंद किंवा कला म्हणून सहभागी होतात. ढोल-ताशा हा पारंपरिक वाद्य प्रकार आहे. त्यामुळे अधिकधिकारी पथकांनी गणेश विसर्जन मिरवणूक, आगमन मिरवणूक यामध्ये सहभागी व्हावे. तसेच, सर्वसमान्य- कष्टकरी कुटुंबातील युवकांना यानिमित्ताने रोजगार निर्माण व्हावा, या दृष्टीकोनातून ढोल-ताशा पथकांची परवानगी शुल्क रद्द करावे, अशी मागणी शंकर जगताप यांनी केली. त्यालाही प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सदर शुल्क रद्द करण्यात आले. त्यामुळे शहरातील ढोल-ताशा पथकांना निशुल्क परवानगी मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button