breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“भीमसृष्टी”मुळे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची महती भावी पिढीला कळेल : भीमराव आंबेडकर

  • माता रमाई स्मारकाच्या उभारणीसाठी महापालिकेत महत्वपूर्ण बैठक
  • महापौर माई ढोरे, स्थायी समिती सदस्या सुलक्षणा शिलवंत- धर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

पिंपरी | प्रतिनिधी

शिव-फुले-शाहू भीमसृष्टीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेने महापुरुषांच्या कार्याची महती उत्कृष्ट प्रकारे मांडली. यामुळे वैचारिक पिढी घडविण्यासाठी बळकटी मिळेल, असा विश्वास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केले.

माता रमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान त्यागमूर्तीचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्यात येत असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहराचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या कामाची तयारी व आढावा घेण्यासाठी स्मारकाशी संबंधित महानगरपालिकेचे सर्व अधिकारी तसेच मान्यवरांची संयुक्त बैठक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी बैठकीत बोलताना त्यांनी महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक एकमेवाद्वितीय स्मारक होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच हे स्मारक भव्य व रचनात्मक व्हावे यासाठी मी देखील प्रयत्नशील आहे,असे ते म्हणाले.

उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, ड- प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसेवक संतोष लोंढे, सचिन चिंचवडे, नगरसदस्या गीता मंचरकर, स्थायी समिती सदस्या डॉ. सुलक्षणा शिलवंत- धर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे तसेच भारतीय बौध्द महासभा, वंचित बहुजन आघाडी यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे यांनी महानगरपालिकेच्या वतीने भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचे स्वागत केले.
बैठकीचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर, आभार शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी मानले.

नियोजित स्मारक अन् डॉ. शिलवंत यांच्या आठवणींना उजाळा…
यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी माता रमाई यांच्या पिंपरी येथील नियोजित स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी मागणी केली. त्यामध्ये बापू गायकवाड, देवेंद्र तायडे, धम्मराज साळवे, प्रकाश ओव्हाळ आदींनी बैठकीत आपले मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, डॉ. अशोक शिलवंत यांनी अशोक स्तंभ उभारणीसाठी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत. समाजाप्रती शिलवंत यांचे कार्य संस्मरणीय आहे, अशा भावना यावेळी भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button