breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#LockDown |पंजाबमध्ये कर्फ्यू पास दाखवण्यावरून निहंग्यांचा पोलिसांवर प्राणघातक हल्ला

पंजाब | पतियाळाच्या भाजीमंडईत आज सकाळी निहंग्यांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा हात कापला गेला. तर इतर दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिस अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पीजीआय चंढीगडला रेफर केले. तर जखमींना पतियाळातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर निहंग गुरुद्वारा खिचडी साहेबमध्ये लपेल होते. कमांडो टीमने गुरुद्वारातून 7 आरोपींना अटक केली आहे.

एसएसपी मनदीप सिंह सिद्धू यांनी सांगितले, एका गाडीतून 5 निहंग सिंह भाजी मंडईत गेले होते. येथे पोलिसांनी त्यांना अडवून कर्फ्यू पासबाबत विचारणा केली होती. पास नसल्यामुळे या लोकांनी पोलिसांशी वाद घातला आणि नाकाबंदीवरील बॅरिकेड तोडून पळण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी त्यांना घेरले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button