breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

‘द केरळ स्टोरी’ पाहणाऱ्यांसाठी मोफत रिक्षा सेवा; महिलांना देणार मोफत तिकीट

पुणे : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या वादात सापडला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा होताच या चित्रपटावर अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. केरळमधील ३२ हजार महिलांनी ईस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करण्याची पुरावे सादर करा आणि एक कोटी रूपये घ्या, असं आव्हान दिलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील एक ऑटोरिक्षा चालकाने थेट मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे.

पुण्यातील आळंदीतील एका रिक्षाचालकाने थेट या चित्रपटासाठी मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. एवढेच नाहीतर पहिल्या १० महिलांसाठी चित्रपटाची तिकिटंसह मोफत रिक्षा सेवा देणार असल्याचं आपल्या रिक्षावर छापलं आहे. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. साधू मगर असं या रिक्षाचालकाचं नाव आहे.

मला पहिल्यापासून धार्मिक कार्याची आवड होती. पण तसे करण्याचे योग्य साधन माझ्याकडे नव्हते. मी माझी ऑटोरिक्षा घेतली तेव्हापासून मी धार्मिक कार्यात व्यस्त आहे. मी द केरळ स्टोरीचा ट्रेलर पाहिला मला खूप मजा आली. ट्रेलर पाहिल्यानंतर मी चित्रपट पाहणाऱ्यांना मोफत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, असं रिक्षाचालक राधू मगर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button