Uncategorized

लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवार आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधोपचार

पिंपरी :

महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात झाली. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत दिंड्या पुणे मुक्काम उरकून आज लोणी काळभोर आणि सासवड येथे दाखल झाल्या. जगद्गुरू श्री संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

वारीत सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. पुणे शहरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान दिवे घाट मार्गे सासवडला तर तुकोबांच्या पालखीचे ने आज लोणी येथे विसावा घेतला. जय हरी विठ्ठलाचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने अवघड असा दिवे घाट पार केला. त्याबरोबर वैष्णवाचा मेळाही हा अवघड घाट अगदी आनंदात पार करत होता.
दिवे घाटातील दरवर्षी वारकरी ज्या दिवसाची वाट बघत असतात. आज हा सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. मोठा टप्प्या पार केल्यावर अनेकांना या चढाई चा थोडाफार त्रास झाला, या वारकऱ्यांच्या थकव्यावर चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने या वारकऱ्यांना मोफत औषधे व सर्व उपचार देऊन मानवतेचे दर्शन घडविल्याचे आज पाहायला मिळाले. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही आरोग्य सेवा रात्री ११ वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होती.

आषाढी वारी निमित्त पायी दिंडीतील वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवार व चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने ॲम्ब्युलन्स व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली आहे. गेली अनेक वर्ष हीनिरंतर मोफत औषधे वैद्यकीय सेवा पुणे ते पंढरपूर दोन्ही पालखी मार्गावर दिली जाते. या सेवेत सर्व औषधे मोफत दिली जातात. या वर्षी सुद्ध या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यासाठी मोफत औषधे देण्यात आली.

पिंपरी : मागील नऊ वर्षांपासून केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आहे. या नऊ वर्षात सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण करीत भारत देशाची संपन्नतेकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या ९ वर्षांमध्ये महाराष्ट्रात आणि देशात केंद्र सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. याची माहिती नागरिकांना घरोघरी जाऊन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव गौरव गौतम यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.

आज बुधवारी (दि.१४) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे, माजी नगरसेवक व भाजपा जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, पिंपरी चिंचवड प्रभारी गणेश वरपे तसेच युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य सचिन जायभाय, अजित कुलथे, अक्षय नलावडे आदी उपस्थित होते.

यावेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेला उपलब्ध करून दिलेल्या विविध योजना आणि प्रत्यक्ष लाभार्थी यांची माहिती देण्यासाठी कार्यरत आहे. भाजपाने नऊ वर्ष भ्रष्टाचार मुक्त आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने देशाचा कारभार केला आहे. हे सर्वसामान्य जनतेला अवगत आहे. ९ वर्षाची विकासाची वाटचाल जनतेपर्यंत पोहोचवण्यात भारतीय जनता युवा मोर्चा विविध कार्यक्रमातून युवकांशी संपर्क साधत आहे. ९ वर्षे देशात प्रगतीची विकास गंगा आलेली आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोट्यावधी लोकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचला आहे. युवा वर्ग हेच देशाचे भविष्य असून एखादा उपक्रम युवा वर्गाने हाती घेतल्यास समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत तो उपक्रम पोहोचवला जातो. म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने भारतीय जनता युवा मोर्चाकडे विविध उपक्रम सोपवले आहेत.

भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी सांगितले की, ३० मे ते ३० जून २०२३ या दरम्यान होणाऱ्या महाजनसंपर्क अभियानात सक्रिय सहभाग घेऊन शहरात सर्वत्र घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. नवमतदार नोंदणी अभियान अंतर्गत
७ जून ते २० जून नवमतदार नोंदणी, प्रति मंडल ५००० पेक्षा अधिक मतदार नोंदणी करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात युवा संवाद संमेलन, युवा वॉरिअर्स शाखा उदघाटन, लाभार्थी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी “मन कि बात” कार्यक्रमामध्ये उल्लेख केलेल्या आपल्या जिल्ह्यातील विशेष व्यक्तींची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. १० ते २० जून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ जून रोजी विदयार्थी विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या समाज उपयोगी निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चा काम करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button