पिंपरी / चिंचवड

चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार : एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

एका 32 वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात बलात्कार, पोक्सो, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना खेड तालुक्यातील एका गावात घडली आहे.

योगेश गजानन रुपनर (वय 32,) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांची साडेचार वर्षांची मुलगी मातंग जातीची असल्याचे माहिती असून देखील आरोपीने तिला त्याच्या घरात बोलावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार फिर्यादी यांना समजला असता त्यांनी तत्काळ पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button