breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराजकारण

“नाशिकचा पुढचा महापौर आमचाच, मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा”- संजय राऊत

मुंबई  ‘सध्याचं राजकीय वातावरण बदललं आहे. त्यामुळे आम्हीही नाशिकपासून कामाला सुरुवात केली आहे तसेच कुणी कितीही वल्गाना केल्या तरी नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल. मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल’, असा विश्वास व्यक्त केला आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी.

आज नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हा विश्वास व्यक्त केला. नाशिकमधील बदलाविषयी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. बाकी निवडणुका तुम्ही पाहिल्याच आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले, असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.

जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. ठाकरे सरकारच्या बाजूने आहे. नाशिकमध्येही महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेना पहिल्या नंबरवर आहे. मात्र सर्वांचा सन्मान राखूनच निवडणुका लढवल्या जाणार आहेत. कोणी कोणा बरोबर गेलं तरी मुंबई मनपा शिवसेनेकडेच राहील आणि नाशिकचा पुढचा महापौरही शिवसेनेचाच होईल, असंही यावेळी राऊत म्हणाले.

वाचाः आपल्याला शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे जावू या – शरद पवार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button