breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘कुठलंही बटण दाबा, मत भाजपालाच मिळणार’; भाजप खासदाराचा दावा!

Bjp Mp Arvind Dharmapuri : निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार होत असून मतदान यंत्रांमध्ये फेरफार केले जात असल्याचा आरोप वारंवार होत आहे. विरोधी पक्षानेही हा मुद्दा उपस्थित करत भाजपाला टार्गेट केलं आहे. दरम्यान, भाजपाच्याच एका खासदारांनी केलेल्या विधानामुळे मतदान यंत्रांवरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कुठलंही बटण दाबा, मत भाजपालाच मिळणार, असं विधान भाजपाच्या खासदारानं केलं आहे.

भाजपाचे तेलंगणातील खासदार धर्मपुरी अरविंद यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, हे पाहा, तुम्ही नोटाचं बटण दाबा, मीच जिंकेन. तुम्ही गाडीवर मत द्या, मीच जिंकेन. तुम्ही हातावर मत द्या, मीच जिंकेन. मी तुमच्या फायद्यासाठी इथे आलोय. येणार तर मोदीच.

हेही वाचा – राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा २९ ऑगस्टला पुणे शहरात 

सर्व राजकीय पक्ष मुस्लिमांकडे त्यांची व्होटबँक म्हणून बघतात. पण त्यांच्या विकासासाठी हे राजकीय पक्ष काम करत नाहीत. बीआरएस सरकारनंही हेच धोरण राबवलं आहे. मुस्लीम समाजाच्या विकासाची त्यांना कोणतीही पर्वा नाही. बीआरएस व एमआयएम यांच्या मैत्रीमध्ये फक्त मुस्लीम अल्पसंख्याकांना त्रास होणार आहे, असंही धर्मपुरी अरविंद म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button