breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

महापूर मानवनिर्मित नसून अतिवृष्टीचा परिणाम- उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली |

सांगली, कोल्हापूरला आलेला महापूर हा मानवनिर्मित नसून अतिमुसळधार पावसाचा परिणाम होता. कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नवजा येथे एका दिवसात ३२ इंच पाउस पडला. महापुराचा आणि अलमट्टीचा काहीही संबंध नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगलीत माध्यमांशी बोलताना सांगितले. सांगली जिल्हयातील  पूरबाधित भागाचा दौरा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बठक झाली. या बठकीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले,की एकाच वेळी अतिमुसळधार पाऊस झाल्याने नसíगक आपत्ती ओढवली. मुसळधार पावसाने शेती बरोबरच रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे अथवा अलमट्टीमध्ये अतिरिक्त पाणीसाठा केल्यामुळे महापूर आला असे म्हणता येणार नाही. नुकसानीची अद्याप पूर्ण पाहणी करण्यात आलेली नसल्याने हानीचा नेमका अंदाज सांगता येणार नाही.

राज्यातील कोकणासह ९ जिल्हयात नसíगक आपत्ती आली असून लोकांना सावरण्याचे काम सुरू आहे. पंचनामे अद्याप झालेले नाहीत. बाधित क्षेत्रातील व्यापारी, शेतकरी यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्यांचा निश्चितपणे विचार केला जाईल. पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्यांना निश्चितच मदतीचा हात शासन देईल. महापुरामुळे जिल्हयातील १०३ गावांना फटका बसला असून शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हयात मदत व बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे ११० जवान तनात करण्यात आले असून ८० बोटी व १ हजार ७०० जॅकेट आहेत. ४१ हजार कुटुंबांना महापुराचा फटका बसला आहे असेही त्यांनी सांगितले.

महापूर व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अभियंता दर्जाचे पथक राज्य शासनाने हानीग्रस्त भागात पाठवले असून सध्या हे पथक साताऱ्यात पाहणी करीत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कराडसह रायगड, रत्नागिरी आदी ठिकाणी कायमस्वरूपी तनात करण्यासाठी आमचे प्रयत्न असून मुख्यमंत्री सर्व स्थितीचा आढावा घेत असून राज्यात उद्भवलेल्या नसíगक आपत्तीबाबत केंद्र शासनालाही अवगत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. भिलवडी बाजारपेठेमध्ये पूराच्या पाण्यात उतरून नुकसानीची पाहणी करीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button