क्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पहिला दिवस तरी इंग्लंडचाच!

पुणे | पहिल्यांदा भारतीय संघाला केवळ 78 धावात गुंडाळून पहिले पाऊल मजबूत टाकणाऱ्या इंग्लंड संघाने फलंदाजी करतानाही मजबूत खेळी करत दिवसाखेर नाबाद सलामी देत भारतीय संघाला पिछाडीवर टाकत आजचा पहिला दिवस आपल्या नावावर केला आहे.रॉरी बर्न्स आणि पुनरागमन करणारा हशीब हमीद यांनी नाबाद 120 धावांची सलामी देत वैयक्तिक अर्धशतके झळकावत आपल्या संघाला पहिल्याच दिवशी चाळीस धावांची आघाडी सुद्धा मिळवून दिली.

मागच्याच आठवड्यात आपल्या उत्तम आणि भेदक गोलंदाजी करून भारतीय संघाला लॉर्ड्सवर विजय मिळवून देणाऱ्या भारतीय गोलंदाजानी आज फलंदाजाची री ओढणारी निर्जीव कामगिरी करत कर्णधार कोहलीला सम्पूर्णपणे निराश केले आहे.

जिथे इंग्लिश गोलंदाज भारतीय संघाला पळताभुई थोडी करत होते तिथेच मजबूत आणि भारतीय सर्वोत्तम पेस अटॅक म्हणवल्या जाणाऱ्या बुमराह आणि कम्पनीने काहीच कमाल दाखवली नाही याचाच फायदा घेत इंग्रज सलामी जोडीने नाबाद 120 धावांची या वर्षीची सर्वोत्तम सलामी भागीदारी नोंदवून आपली वैयक्तिक अर्धशतके सुद्धा झळकावली आहेत.

अद्यापही इंग्लिश एकही गडी बाद झाला नसूनही इंग्लंड संघाकडे चाळीस धावांची आघाडी असल्याने या कसोटीवर पहिल्या दिवशी तरी इंग्लंड संघाने पकड मिळवली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button