पिंपरी / चिंचवड

घरात बोलावून पाच वर्षीय मुलीचा विनयभंग : एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

एका व्यक्तीने पाच वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच मुलीच्या पोटात मारून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना 2 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी पावणे चार ते चार वाजताच्या कालावधीत देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सुसंता राजेंद्रनाथ बस्के (वय 31, रा. महेश कपुरी, छतना, जि. बंकूरा, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 24 वर्षीय आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी दुपारी फिर्यादी यांची पीडित मुलगी त्यांच्या घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला त्याच्या घरात बोलावून घेतले. मुलीच्या पोटात मारून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवी पन्हाळे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button