TOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

लम्पी’मुळे पाच हजार गोवंशाचा मृत्यू

राज्यातील ३२ जिल्ह्यांतील २६०५ गावांत पसरलेल्या लंबित त्वचारोगाने ५६०२ बळी घेतले आहेत. रोगाचा संसर्ग घटत असला तरीही मृत्यू झालेल्या गोवंशाची संख्या मोठी आहे. बाधित जनावरांची संख्या मोठी असल्यामुळे दूध संकलनावरही परिमाण झाला आहे. रोगाचा संसर्ग झाल्यानंतर तत्काळ उपचार सुरू झाल्यास पशू उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. पण, उपचार उशिराने सुरू झाल्यास जनावरे उपचाराला प्रतिसाद देत नाही. शिवाय अशी जनावरे दगावण्याची शक्यताही वाढते.

राज्यामध्ये शनिवारअखेर ३२ जिल्ह्यांमधील एकूण २६४६ गावांमध्ये लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. बाधित गावांतील एकूण १,१,३२१ बाधित पशुधनापैकी एकूण ६१,९१६ पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर १४०.९७ लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून १२९.५८ लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.

आठ जिल्ह्यांत लसीकरण पूर्ण

जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे ९२.६१ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

देशात ८५ हजार जनावरांचा मृत्यू

देशात १९ सप्टेंबरपर्यंत या रोगामुळे ८५६२८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थानमध्ये ५५४४८, पंजाबमध्ये १७६५५, गुजरातमध्ये ५८५७, हिमाचल प्रदेशमध्ये ४३४७ आणि हरियानामध्ये २३२१ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

देशी गोवंशाला सर्वाधिक फटका

लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव फक्त गोवंशात होत आहे. त्यातही देशी गोवंशामध्ये वेगाने संसर्ग होत आहे. शिवाय मृत्यू होणाऱ्या जनावरांमध्ये देशी गोवंशाची संख्या जास्त आहे. संकरित गायी जास्त दूध देत असल्यामुळे संकरित जनावरांची शेतकऱ्यांकडून काळजी घेतली जाते. वेळेवर लसीकरण करून पुरेसे पशुखाद्य दिले जाते. त्यामुळे संकरित गायीमध्ये रोग प्रतिकारक क्षमता जास्त आहे. देशी गायीची दूध देण्याची क्षमता कमी असल्यामुळे या जनावरांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जनावरांचे लसीकरण वेळेत होत नाही. त्यामुळे ही जनावरे अशक्त राहतात. अशक्त जनावरांमध्ये लम्पी रोगाचा वेगाने प्रसार होत आहे. शिवाय मृत्यू होणाऱ्या जनावरांमध्ये देशी गोवंशाची संख्या जास्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button