ताज्या घडामोडीमुंबई

ठाणे जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लशींचा तुटवडा

ठाणे | करोना निर्बंधातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ठरवून दिलेली लसीकरणाची टक्केवारी गाठण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. असे असताना जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लशीच्या तुटवडय़ामुळे १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात केवळ २८ हजार कोव्हॅक्सिन लशीचा साठा शिल्लक असून हा साठा एक ते दोन दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्य शासनाने ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले. या वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस देणे सक्तीचे असून त्यानुसार अनेक मुलांना कोव्हॅक्सिन लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. २८ दिवसांनंतर कोव्हॅक्सिन लशीची दुसरी मात्रा देण्यात येते. अनेक मुलांना लशीची पहिली मात्रा घेऊन २८ दिवसांचा काळ पूर्ण झाला आहे. दुसरी मात्रा घेण्यासाठी मुले केंद्रांवर गर्दी करत आहेत. परंतु लशीच्या तुटवडय़ामुळे त्यांना माघारी परतावे लागत आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून या वयोगटासाठीच्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

जिल्ह्यात केवळ २८ हजार ७५० कोव्हॅक्सिन लशीचा साठा शिल्लक आहे. हा साठा केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी परिसरातील दोन ते तीन शाळेतील विद्यार्थ्यांचे एकत्रित गट करून एक केंद्र उभारण्यात आले होते. तिथे मुलांचे लसीकरण केले जात आहे. ठाणे शहरातही ३० ते ३५ केंद्रांवर या वयोगटासाठी लसीकरण होत असून यापैकी एक ते दोन केंद्रवगळता इतर केंद्रांवर नोंदणीविना लसीकरण केले जात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून कोव्हॅक्सिन लशीचा तुटवडा भासू लागल्यामुळे या वयोगाटील विद्यार्थ्यांचे लसीकरण सत्र कमी करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लस घेतली होती. त्या विद्यार्थ्यांची दुसरी मात्रा घेण्याची मुदत संपली आहे. या मुलांना दुसरी मात्रा घेण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात एक ते दोन दिवस पुरेल इतकाच कोव्हॅक्सिन लशीचा साठा शिल्लक आहे. नवीन साठा तीन ते चार दिवसात येण्याची शक्यता आहे.

– डॉ. अंजली चौधरी, लसीकरण सत्र प्रमुख, ठाणे जिल्हा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button