breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…अखेर जेष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांना मिळाली कोव्हीडची लस

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड च्या पुढाकारातुन डॉ. पी. डी. पाटील यांच्या सहकार्याने अभिनेत्री मधु कांबीकर यांचे कोव्हीड लसीकरण
पिंपरी । प्रतिनिधी
सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर या अर्धांगवायूने आजारी असून सध्या त्या चित्रपट क्षेत्रापासून दूर आहेत. त्यांनी अनेक चित्रपट लोकप्रिय केले असून त्यांचे चाहते सर्वत्र महाराष्ट्रभर आहेत. सध्या त्या अंथरुणाला खिळून असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पुणे महानगरपालिकेला, घरी येउन त्यांना लस देण्याची विनंती केली परंतु त्यांच्या असहाय स्थितिमधल्या हाकेतील आर्तता महापालिकेला आजपर्यंत कळली नाही.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडच्या बैठकीत ही गंभीर बाब त्यांचे स्नेही लहू पाटील मडके यांचे कडून मिळालेल्या माहितीनुसार अविनाश कांबीकर यांनी मसाप चे अध्यक्ष राजन लाखे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी त्वरीत कांबीकर याना सोबत घेउन डॉ  डी. वाय. पाटील हॉस्पिटल चे कुलपती डॉ.  पी. डी पाटील यांची भेट घेऊन अभिनेत्री ची स्थिती सांगून लस देण्यास विनंती केली. डॉ. पी. डी. पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या डॉक्टरांना तशा सुचना देऊन त्वरीत कार्यवाही करण्यास बजावले आणि दुसर्याच दिवशी मधु कांबीकर यांना त्यांच्या येरवडा येथील घरी जाऊन त्यांना लस देण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी डॉ  पी. डी. पाटील यांचे शतश:आभार मानले असून सामाजिक भान ठेऊन सतत कार्यरत असणार्या मसाप पिं. चिं. चेही कौतुक केले आहे.

अभिनेत्री मधू कांबीकरांनी तब्बल चार दशके कलेची सेवा केली. त्यांचा कलेचा प्रवास हा लावणी, लोकनाट्य, चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका पुन्हा लोकरंगमंच अशा विविध अंगानं बहरलेला राहिला. नागर रंगभूमी व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या अभिनेत्रींचे स्थान निश्चित वाखाणण्यायोग्य आहे. माना – सन्मानाचे पुरस्कार व प्रसिद्धी मिळूनही त्यांनी सखी माझी लावणी या कार्यक्रमाचे  ‘प्रयोग अमेरिका, अबुधाबी, दुबई, मॉरिशियस अशा देशात करून मराठी मनाच्या लावणीस बहुमान प्राप्त करून दिला. शब्दप्रधान लावणीनृत्य सादर करून शब्दांना अर्थवाही केले. पूरक मुद्राभिनय आणि आंगिक अभिनयानं फुलवण्याचे कसब मधू कांबीकरानी करून दाखवले.

दरम्यान २०१६ मध्ये  एका लावणीच्या कार्यक्रमात त्यांना पक्षाघाताचा ( अंर्धागवायूचा) झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार केले पंरतू मागील ४ वर्षा पासून त्या अंथरुणात खिळून असून घरीच उपचार चालू आहेत, सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यातील येरवडा येथील घरी आहे.लसीकरणाच्या वेळी  त्यांचा मुलगा प्रीतम कांबीकर आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य उपस्थीत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button