breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

‘अॅपल’ कंपनीचे बाजारमूल्य जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त

नवी दिल्ली – प्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलने जगात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अॅपल या कंपनीचे बाजारमूल्य गुरुवारी १ ट्रिलियन डॉलर एवढे झाले. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारमूल्य असणारी अॅपल कंपनी अमेरिकेतील पहिली व जगातील दुसरी कंपनी बनली आहे.

अॅपलच्या कंपनीचे बाजारमूल्य अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. जगातील सहावी अर्थव्यवस्था असलेल्या भारताच्या जीडीपीतील ३८ टक्क्यांच्या हिस्स्याची बरोबरी अॅपलने केली आहे. याचबरोबर अॅपलने भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएससारख्या तगड्या कंपन्यांना मागे सोडले आहे. तर पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा तीन पट जास्त अॅपलचे बाजारमूल्य आहे.

वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, जगातील १७७ देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक अॅपलच्या कंपनीचे बाजारमूल्य आहे. तर केवळ १६ देशांचे जीडीपी या मुल्यापेक्षा जास्त आहेत.

दरम्यान, मंगळवारी अॅपल कंपनीने आपली आर्थिक स्थितीची माहिती गुंतवणुकदारांना दिली. यानंतर बाजारात अॅपलच्या शेअर्सचे भाव कमी झाले होते. परंतु गुरुवारी पुन्हा बाजारात अॅपलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button