breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

७२ तासांत फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा हल्ला; चर्चच्या फादरवर अज्ञाताने गोळ्या झाडल्या

ल्योन – फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. ७२ तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. फ्रान्सच्या ल्योन सिटीमध्ये चर्चच्या गेटवर चर्चच्या फादरवर गोळी झाडून अज्ञात हल्लेखोर फरार झाला आहे. चर्चच्या धर्मोपदेशकाला मारल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रीक पारंपरिक चर्चमधील फादरवर खूप जवळून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात चर्चचे मुख्य धर्मोपदेशक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. तर फरार झालेल्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराने लांब काळा कोट घातला होता. या कोटात त्याने बंदूक लपवून ठेवली होती. ल्योन चर्चच्या जवळ जात त्याने फादरवर हल्ला केला आणि तिथून पळ काढला. फारदवर हल्ला झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल केले. हल्लेखोराचा यामागे काय उद्देश आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी फ्रान्समध्ये नीस शहरात एका चर्चजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button