breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

“विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आल्याने फडणवीसांची दिल्लीवारी”

मुंबई – राज्यात सचिन वाझे प्रकरणात दरदिवशी मोठे खुलासे एनआयए कडून केले जात असतानाच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मधेच दिल्लीवारी केल्याने, त्यांचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात असल्याची आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणात, एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक केल्यानं सरकारची कोंडी झाली आहे. या स्फोटक प्रकरणाचा तपास ठाकरे सरकारने सचिन वाझेंवर सोपवला होता, परंतु वाझे यांनीच हा कट रचल्याचा संशय एनआयएला आहे. यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे.

वाचा :-पोलीस दलातल्या अधिकाऱ्याने, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उघडपणे जाहीर केली नाराजी

सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीतही अनेक घडामोडी घडत असून, शरद पवार वाझे प्रकरणावर नाराज असल्याने, राष्ट्रवादीने लावून धरलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागणीमुळेच, मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्याच बोललं जातं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्लीत होते, या प्रकरणावर फडणवीसांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन करून दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट यावेळी त्यांनी केला. या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button