breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Fact Check:  शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुख महेश लांडगे यांना ‘धक्का’ ? वाचा वस्तुस्थिती काय आहे? 

शिरुर लोकसभा समन्वयकपदी राजेश पांडे यांच्या नियुक्तीने चर्चा : पक्ष संघटनेतील पदांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये कमालीचा संभ्रम

पुणे । विशेष प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्त्वाने २०२४ मधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेश पांडे यांना शिरुर लोकसभा समन्वयकपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ‘डॅशिंग’ आमदार महेश लांडगे यांची जबाबदारी काढून घेतली आणि त्यामुळे भाजपाने लांडगेंना धक्का दिला, अशी चर्चा जोर धरु लागली होती. 

याबाबत ‘महाईन्यूज’ ने प्रदेश भाजपातील वरिष्ठांशी बोलून माहिती घेतली. त्यानुसार,  भाजपाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाविजय-२०२४’ अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक नेमले आहेत. यामध्ये शिरुरची जबाबदारी राजेश पांडे यांच्यावर दिली आहे. 

वास्तविक, पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात नव्याने समन्वयक भाजपाने नेमले आहेत. त्यामुळे काहीसा संभ्रम आहे. यापूर्वीच ‘लोकसभा निवडणूक प्रमुख’ म्हणून  पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे, बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्याकडे आणि आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे दिली होती. 

आता ‘महाविजय-२०२४’ अभियानांतर्गत राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघामध्ये स्थानिक पातळीवर समन्वयक करण्याच्या उद्देशाने ‘समन्वयक’पदाच्या नियुक्ती करण्यात येत आहेत. त्याअनुशंगाने राजेश पांडे यांच्याकडे शिरुर लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती आहे. राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपामध्ये आले आहेत. ते अभविपचे प्रदेशाध्यक्ष होते. आता ते भाजपाचे उपाध्यक्ष आहेत. 

मिथक काय आहे? 

शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडे होती मात्र आता ती जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे हा महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जात आहे. 

वस्तुस्थिती काय आहे? 

भाजपा पक्ष संघटनेच्या पद संरचनेनुसार, लोकसभा निवडणूक प्रमुख, समन्वयक, प्रभारी आणि संयोजक अशी चार महत्त्वाची पदे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण केलेली आहेत. शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी यापूर्वीच आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. महाविजय-२०२४ अभियानांतर्गत समन्वयकपदी राजेश पांडे यांनी नियुक्ती केली असून, लोकसभा प्रवास योजना प्रभारीपदी आमदार माधुरी मिसाळ कामकाज पाहत आहेत. तसेच, संयोजकपदी ॲड. धर्मेंद्र खांडरे आहेत. त्यामुळे महेश लांडगे किंवा अन्य कुणाचीही जबाबदारी काढली किंवा कमी केली आहे, असे नाही. याउलट, भाजपा पक्षश्रेष्ठी निवडणुकीची यंत्रणा आणखी सक्षम केली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button