TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

महापालिका निवडणुकीसाठी 173 जागांपैकी ओबीसी साठी 46 आरक्षित

 पुणेः पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी १७३ प्रभागांपैकी ४६ प्रभागांमध्ये मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण सोडतीचा फटका अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना बसला आहे. आरक्षण सोडतीमुळे अडचणीत आलेल्यांना काहींवर तिकिटासाठी स्वत:च्या पक्षातच रस्सीखेच करण्याची वेळ येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार ओबीसी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त यशवंत माने उपस्थित होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने या आरक्षणात कोणताही बदल होत नसल्याने ३१ मे २०२२ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार त्यांचे आरक्षण कायम राहिले आहे. मात्र, या दिवशी काढण्यात आलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण हे रद्द झाले होते. ‘आरक्षण सोडतीबाबत दोन ऑगस्टपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत,’ असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.

तारखा लवकरच

महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया अंतिम करण्यात आल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारकडून अद्याप महापौर आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांमध्ये जाहीर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला दिल्या आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने वर्तवली आहे.

सात प्रभागांत खुला गट नाही

आरक्षण सोडतीमध्ये सात प्रभागांमध्ये खुल्या गटासा‌ठी आरक्षण पडलेले नाही. त्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन (लोहगाव-विमाननगर), प्रभाग क्रमांक २१ (कोरेगाव पार्क-मुंढवा), प्रभाग क्रमांक ३७ (जनता वसाहत-दत्तवाडी), प्रभाग क्रमांक ३९ (मार्केटयार्ड-महर्षीनगर) प्रभाग क्रमांक ४२ (रामटेकडी- सय्यद नगर), प्रभाग क्रमांक ४६ (महंमद वाडी-उरळी देवाची), प्रभाग क्रमांक ४७ (कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी) या प्रभागांचा समावेश आहे.

दृष्टिक्षेपात…

– महापालिकेमधील १७३ प्रभागांपैकी ओबीसी प्रवर्गासाठी ४६ जागांचे आरक्षण निश्चित

– महापालिकेच्या ५८ प्रभागांपैकी ५७ प्रभाग हे त्रिसदस्यीय असून, एक प्रभाग (प्रभाग क्रमांक १३) हा द्विसदस्यीय

– २९ प्रभागामध्ये तीनपैकी दोन जागा या महिलांसाठी राखीव

– सात प्रभागांमध्ये तीनही जागांवर आरक्षण

प्रवर्ग एकूण जागांची संख्या महिलांसाठी आरक्षित जागा

अनुसूचित जाती जमाती २३ १२

अनुसूचित जमाती २ १

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ४६ २३

सर्वसाधारण १०२ ५१

एकूण १७३ ८७

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button