breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत वाढवली, अन्यथा भरावा लागेल दंड

नवी दिल्ली – इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली असून टॅक्सपेयर ३१ डिसेंबरपर्यंत फाईल करू शकतात. मात्र त्यानंतर आयटीआर भरल्यास १ ते ५ हजारपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयटीआर भरण्याची डेडलाईन पुन्हा एकदा वाढवून 31 डिसेंबर 2021 केली आहे. 31 डिसेंबर नंतर आयटीआर भरल्यास 5,000 रुपये दंड द्यावा लागले. मात्र, टॅक्सपेयर्सची कमाई 5 लाख रुपयांच्या आत असेल तर लेट फाइन म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील.

कोणत्या लोकांना द्यावी लागत नाही पेनल्टी

ज्याचे ग्रॉस इन्कम बेसिक सूटच्या मर्यादेपेक्षा जास्त नाही, त्यांना आयटीआर फाइल करण्यात उशीर झाल्यास कोणतीही पेनल्टी लागणार नाही. जर ग्रॉस इन्कम सवलतीच्या बेसिक मर्यादेपेक्षा कमी असेल तर उशीराने रिटर्न फाइल करण्यावर सेक्शन 234F अंतर्गत कोणताही दंड लागणार नाही.

कसे फाईल करावे ITR (e-filing portal) :

जर तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन आपला टॅक्स रिटर्न फाइल करायचा असेल तर तुम्ही या स्टेपच्या मदतीने भरूशकता –

– ऑनलाइन पद्धतीने प्राप्तीकर रिटर्न फाइल करण्यासाठी सर्वप्रथम प्राप्तीकरचे ई-फायलिंग पोर्टल incometax.gov.in वर व्हिजिट करा.

– यानंतर पोर्टलवर लॉगइन बटनवर क्लिक करा.

– यानंतर यूजरनेम नोंदवून कंटीन्यू पर्यायावर क्लिक करा.

– पासवर्ड नोंदवा.

– यानंतर ई-फाईलच्या टॅबवर क्लिक करून फाईल इन्कम टॅक्स रिटर्नच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

– आता असेसमेंट ईयरचा पर्याय निवडून कंटीन्यू पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा ऑपशन येईल.

– ऑनलाइन ऑपशनवर क्लिक करून पुढे जा.

– या स्टेपनंतर दिलेले ऑपशन – इंडिव्हिज्युअल, हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली (HUF) किंवा ऑदर्स पैकी इंडिव्हिज्युअल पर्याय निवडा.

– यानंतर कंटिन्यू टॅबवर क्लिक करा.

– या स्टेपनंतर आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 पर्यायाची निवड करून प्रोसीडच्या पर्यायावर टॅबवर क्लिक करावे लागेल.

– यानंतर पुढील स्टेपमध्ये मूलभूत सूट मर्यादेच्या वर किंवा कलम 139 (1) अंतर्गत सातव्या तरतुदीमुळे आपला रिटर्न दाखल करण्याचे कारण विचारले जाईल.

– तुम्हाला हे ठरवावे लागेल की, ऑनलाइन आयटीआर दाखल करताना योग्य पर्याय निवडला आहे.

– या स्टेपनंतर बँक डिटेल नोंदवा.

– यानंतर तुमच्या समोर आयटीआर फाईल करण्यासाठी नवीन पेज उघडून समोर येईल.

– यानंतर तुम्हाला तुमचे आयटीआर व्हेरिफाय करून याची एक हार्डकॉपी प्राप्तीकर विभागाला पाठवावी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button