breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीडमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॅग उघडली अन्…

बीड |

बीडमध्ये बस स्थानकात एक बेवारस बॅग सापडल्याने बीडमध्ये आणि बस स्टँड भागांमध्ये खळबळ उडाली. मात्र, ट्रॅफिक पोलीस यांच्या सतर्कतेमुळे यंत्रणा कामावर लागली आणि त्या बॅगेमध्ये नेमकं काय आहे? हे पाहून जनतेच्या मनातील भीती ही पोलीस प्रशासनाने काढल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

बीड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात एक बेवारस बॅग असल्याचे आढळताच नागरिकांनी बस स्टँड लगतच असलेली पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेले हेडकॉन्स्टेबल जावळे, पोलीस कॉन्स्टेबल कोकणार आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल दराडे यांना माहिती दिली. या तिघांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन पाहणी करत इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलीस कंट्रोलला कळवत तात्काळ यंत्रणा हलवली. काही क्षणामध्ये या घटनास्थळी पोलीस यंत्रणेचे डॉग स्कॉड, बॉम स्कॉड आणि पोलीस यंत्रणा ही झपाट्याने याठिकाणी दाखल झाली आणि त्यानंतर या घटनास्थळी असलेली बेवारस बॅग याचा शोध आणि तपास सुरू झाला.

बॅगमध्ये आढळले कपडे…

हा सर्व प्रकार पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. मात्र, त्या बॅगमध्ये नेमकं काय आहे? हे कोणालाच माहीत नव्हते पण पोलिस यंञनेने स्वतःवर उदार होऊन पोलीस प्रशासनाने या बॅगेचा पूर्ण तपास करून पाहिला असता ही बॅग उघडली. मात्र, यामध्ये कपडे सापडल्याने कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांच्या या तत्पर कार्याने भयभित झालेले नागरिक जीव मुठीत घेऊन बसले होते . मात्र, बॅगेत काहीच नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पोलिसांच्या कार्याचे कौतुक देखील नागरिकांनी केले. या कर्तव्यदक्षपणामुळे पोलिसांची मान कुठेतरी उंचावलेली पाहायला मिळते.

बीड पोलिसांचं सर्वत्र कौतुक…

गेल्या अनेक दिवसांपासून एक ना अनेक घटना घडत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी कुठेतरी संताप देखील व्यक्त होताना पाहायला मिळत होता. मात्र, आता या घटनेनंतर पुन्हा एकदा बिडकरांच्या मनात पोलिसांनी जागा मिळवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button