breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत थर्टी फर्स्ट पार्टीत तरुणीची हत्या

मुंबई – मुंबईत नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्टीतच पहिली हत्या घडली. खार पश्चिम भागात एका २१ वर्षीय तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडसह एका तरुणीने बेदम मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला. जान्हवी कुकरेजा असे या तरुणीचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बॉयफ्रेंडसह एका मुलीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खारमधील भगवती हायईट्स या इमारतीच्या टेरेसवर नव्या वर्षानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इमारतीत राहणाऱ्या तरुणांनी पार्टी आयोजित केली होती. तर या पार्टीत दोन्ही संशयित आरोपी श्री जोगधनकर (वय २२) आणि दिया पडणकर (वय १९) यांच्यासह जान्हवी कुकरेजालाही बोलवण्यात आले होते. तिच्या हत्येनंतर जान्हवीच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितले की, ‘तिला दोघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या दोघांनी तिचे केस पकडून फरफटत दुसऱ्या मजल्यावर नेले. त्यातच तिच्या डोक्याला मार लागला आणि प्रचंड रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. पार्टीत असलेल्या सगळ्यांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. तोपर्यंत जान्हवीचा मृत्यू झाला होता. जोधनकर मुख्य संशयित आरोपी आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी पार्टीत सहभागी झालेल्या इतरांची चौकशी केली. मोठ्या आवाजात गाणी सुरू असताना अचानक तिघांमध्ये भांडण सुरू झालं. भांडण नेमकं कशामुळे सुरू झालं, याचा अंदाज कुणालाही आला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button