breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“राहुल गांधींनी नागपूरला संघ मुख्यालयात जावं आणि तिथे नतमस्तक व्हावं”; हिमंता बिस्वा शर्मा

“RSS आणि भाजपाला गुरू मानण्यापेक्षा भारतमातेला आणि भारताच्या ध्वजाला गुरू माना”

दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनी यावेळी भाजपला आणि संघाला खोचक टोला लगावला. भाजपा आणि संघ यांना मी गुरू मानतो असं राहुल गांधींनी. या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी राहुल गांधी यांना आव्हानच दिलं आहे.

राहुल गांधी यांनी जर भाजपा आणि आरएसएसला गुरूतुल्य मानलं असेल तर त्यांनी नागपूरला संघ मुख्यालयात जावं आणि तिथे संघाच्या झेंड्यासमोर नतमस्तक व्हावं, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले.

मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की RSS आणि भाजपाला गुरू मानण्यापेक्षा भारतमातेला आणि भारतमातेचं चित्र असलेल्या ध्वजाला गुरू माना. नागपूरमध्ये ते आले आणि भारतमातेच्या ध्वजासमोर नतमस्तक झाले तर आम्ही त्यांचं नक्की स्वागतच करू, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले.

काँग्रेस किंवा इतर कुठलाही विरोधी पक्ष हा कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर आणू शकत नाही. त्यामुळे आता ही वक्तव्यं केली जात आहेत. समोर कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार असू द्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच विराजमान होतील, असंही हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button