breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

न्यायाधीशाच्या अवमानप्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान दोषी ठरण्याची शक्यता, इस्लामाबाद उच्च न्यायालयात होणार सुनावणी

महाईन्यूज । लाहोर । वृत्तसंस्था ।

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यायाधीश जेबा चौधरी यांना धमकावल्याप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. इम्रान खान यांच्या विरोधात दाखल झालेल्या न्यायालयाच्या अवमान प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालय त्यांना दोषी ठरवले जावू शकते. मुख्य न्यायमूर्ती अतहर मिनाल्लाह, न्यायमूर्ती मोहसीन अख्तर कयानी, न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब, न्यायमूर्ती तारिक महमूद जहांगिरी आणि न्यायमूर्ती बाबर सत्तार यांचा समावेश असलेले पाच सदस्यीय खंडपीठ या कारवाईला सुरुवात करेल, अशी बातमी एएनआयने दिली.

असमाधानकारक प्रकरण ः उच्च न्यायलय
20 ऑगस्ट रोजी एका रॅलीदरम्यान एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल इस्लामाबादचे सदर दंडाधिकारी अली जावेद यांच्या तक्रारीवरून इम्रान खानवर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर रोजी हे प्रकरण असमाधानकारक असल्याचे म्हटले होते.

इम्रान खानवर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता
20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील भाषणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांना अपमानास्पद भाषा वापरणे आणि धमकावल्याचा आरोप करत इम्रान खान विरुद्ध मरगल्ला पोलिस ठाण्यात दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button