Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

पतीसोबत झालेल्या भांडणात पत्नीने केलेल्या कृत्याने सगळेच हादरले

तामिळनाडूः तामिळनाडुतून एक अजब घटना समोर येत आहे. पतीसोबत झालेल्या भांडणात पत्नीने केलेल्या कृत्याने सगळेच हादरले आहेत. राग अनावर झालेल्या पत्नीने झोपलेल्या पतीच्या गुप्तांगावर उकळते पाणी फेकल्याची भयंकर घटना घडली आहे. जखमी झालेल्या पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात तक्रार दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तामिलनाडुतील रानीपेट जिल्ह्यातील पुदुपट्टू भागातील ही घटना आहे. ३२ वर्षीय थंगराज यांचा सात वर्षांपूर्वी प्रियासोबत लग्न झाले होते. दोघांना दोन मुली आहेत. थंगराज एका खासगी कंपनीत कामाला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियाला थंगराजवर संशय होता. कंपनीतील एखाद्या महिलेसोबत थंगराजचे प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय तिला होता. त्यावरुन दोघांमध्ये नेहमी भांडण होत होती. मंगळवारीही त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाले. पण वाद इतका विकोपाला पोहोचला की त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.

भांडणानंतर थंगराज झोपण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला. मात्र, रोजच्या भांडणांना वैतागलेल्या प्रियाने संतापाच्या भरात थंगराजच्या गुप्तांगावर उकळते पाणी फेकले. गुप्तांगावर उकळते पाणी पडल्यामुळं थंगरात जोर- जोरात ओरडण्यास सुरुवात केली. थंगराजच्या ओरडण्यामुळं शेजारी धावत आले. वेदनेने विव्हळणाऱ्या थंगराजला सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

कावेरीपक्कम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थंगराजच्या गुप्तांगावर पाणी पडल्याने ५० टक्के भाजलं आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button