ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ब्रेकअपनंतरही ‘तू माझीच’ म्हणत प्रेयसीचे फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवले, प्रियकरावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड | ब्रेकप झाल्यानंतरही प्रेयसीचा पाठलाग करून तिला त्रास देणार्‍या आणि आधीच्या प्रेमसंबंधवेळचे फोटो व्हाट्सअप स्टेटसवर ठेऊन बदनामी करणाऱ्या प्रियकरा विरोधात अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. कराड तालुक्यातील 29 वर्षीय प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे. 2014 ते 2017 या कालावधीत दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघात दुरावा आला आणि ते वेगळे झाले. यानंतरही आरोपीने वारंवार फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करून, मेसेज करून तिचा पाठलाग करून सातत्याने तीला त्रास दिला. इतकेच नाही तर समाजात तिची बदनामी व्हावी यासाठी प्रेमसंबंध असतानाच्या काळातील दोघांचे एकत्र असलेले फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलीसात तक्रार दिली. अलंकार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button