breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

LPG गॅस सिलिंडरवर पुन्हा सबसिडी मिळणार

LPG सिलिंडरवर मिळणारी सबसिडी आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ग्राहकांच्या बँक खात्यात सबसिडी ट्रान्स्फर करण्यात आले असून अनेक ग्राहकांना ७९.२६ ते २३७.७८ रुपये प्रति सिलिंडर सबसिडी मिळाली आहे.

सबसिडीसाठी निकष काय?

ज्या ग्राहकांचे वार्षिक उत्पन्न १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना सबसिडी मिळणार नाही. १० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांच्या खात्यात सबसिडी जमा होणार आहे. 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांच्या मिळकतीसह ग्राह्य धरले जाणार आहे.

किती मिळणार सबसिडी?

सबसिडीच्या रक्कमेबाबत ग्राहकांच्या मनात गोंधळ आहे. कारण काहीना ७९.२६ रुपये सबसिडी मिळत असून काहीना 158.52 रुपये किंवा 237.78 रुपये मिळाले आहेत.

तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे घरबसल्या तपासा
✓ सर्वप्रथम तुम्हाला इंडियन ऑइलच्या https://cx.indianoil.in/ या वेबसाइटला भेट द्या.

✓ आता तुम्हाला Subsidy Status वर क्लिक करून पुढे जावे लागेल.

✓ यानंतर तुम्हाला Subsidy Related (PAHAL) या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला Subsidy Not Received वर क्लिक करावे लागेल.

✓ तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि एलपीजी आयडी टाकावा लागेल.

✓ त्यानंतर व्हेरिफिकेशन करून सबमिट करा.
यानंतर तुम्हाला समोर संपूर्ण माहिती मिळेल.

14 किलो सिलेंडरचे वजन कमी होऊ शकते
सिलिंडर वाहतूक करताना महिलांना अडचणी येत असल्याने केंद्र सरकार घरगुती एलपीजी सिलेंडरचे वजन कमी करण्याच्या तयारीत आहे. 14.2 किलो वजनाचे गॅस सिलेंडर कमी करण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button