पिंपरी / चिंचवड

वैद्यकीय परिषदेची उत्साहात सांगता : परिषदेत जगातील 500 हून अधिक डॉक्टरांचा सहभाग

पिंपरी | प्रतिनिधी

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व संशोधन केंद्रामध्ये पुणे ऑब्स्ट्रेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीच्यावतीने डॉ. सुनीता तांदुळवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘एंडोस्कोपी’ या विषयावरील पीओजीएस स्टार एंडो गायनिक परिषद 2022 ची उत्साहात सांगता झाली. पुण्यातील ही 8 वी एंडोस्कोपिक परिषद असून याकरिता जगभरातून विविध तज्ञ डॉक्टर्स प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यपीठ सभागृहात परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील, प्र- कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगरू डॉ. एन. जे. पवार, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, सुप्रसिद्ध वंधत्वरोग व एंडोस्कोपी तज्ञ डॉ.सुनीता तांदुळवाडकर, डॉ.किरण कुर्तकोटी, डॉ.हेमंत देशपांडे, डॉ. वैशाली कोरडे नाईक, डॉ.मीनू आगरवाल, डॉ.मीनल पटवेकर, डॉ. चैतन्य गनपुले, डॉ.निलेश बालकवाडे, डॉ.लक्ष्मीकांत बेहेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन व बासरीवादनाच्या मंगल ध्वनीने परिषदेला सुरुवात झाली.

डॉ.सुनीता तांदुळवाडकर यांनी कार्यकामाचे प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या “स्त्रीरोगविषयक आजारांवरील लॅपरोस्कोपिक आणि हिस्टेरोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी विविध तज्ञाचे मार्गदर्शन लाभले असून सलग दोन दिवसात तब्बल 67 राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात एंडोस्कोपिक सर्जनद्वारे 60 शस्त्रक्रिया या शस्त्रक्रियागृहातून थेट प्रक्षेपनाद्वारे दाखविण्यात आल्या. त्यासाठी सर्व अद्ययावत सेवा सुविधानी परिपूर्ण असे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील सहा शस्त्रक्रियागृह उपलब्ध झाले होते”. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. पी. डी. पाटील व डॉ. भाग्यश्री पाटील यांचे त्यांनी विशेष आभार मानले. या सर्व शस्त्रक्रिया मोफत होत आहेत तसेच पुढील वर्षी जागतिक पातळीवरील परिषद आयोजित करण्याचा मानस आहे अशी माहिती डॉ. तांदुळवाडकर यांनी दिली.

“आज डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ही परिषद होत आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे. पीओजीएस स्टार एंडो गायनिक परिषदे साठी लागणाऱ्या सर्व सेवासुविधा आम्ही देऊ शकलो याच मनस्वी अभिमान वाटतो” असे डॉ. पी. डी. पाटील म्हणाले.

“ या परिषदेच्या माध्यमातून जगभरातून आलेल्या तज्ञ डॉक्टरांनी आपल्या अनुभवांची देवाण घेवाण करण्याची संधी प्राप्त झाली आहे, याचा फायदा रुग्णाना नक्कीच होईल” असे डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या.

शैक्षणिक विषयानुसार तज्ञांची व्याख्याने, मार्गदर्शन, परिसंवाद, शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव, पाठपुरावा, विषयानुसार सादरीकरण आदी झाले परिषदेत 500 हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला होता तर वैद्यकीय प्रदर्शनाच्या माध्यमातून 25 हून अधिक वैद्यकीय क्षेत्रातील कंपन्या ही सहभागी झाल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button