breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

‘चॅलेंजर’ च्या गरब्याला महिलांसह आबालवृद्धांचा उत्साह

  • अनिता काटे : दांडिया महोत्सवामुळे सोसायटीतील नागरिक एकत्र

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पिंपळे सौदागर येथील सोसायटीतील नागरिक आणि भाविकांसाठी नवरात्रीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंच्या वतीने सलग तीन दिवस ‘ भव्य दांडिया महोत्सव २०२२ ‘ चे आयोजन करण्यात आले होते. गुजराती गरबा व लोकगीते यांच्यासोबतच साऊंड ट्रॅकवरील दांडिया नृत्य, सोबतच खास आकर्षण सारेगमपा गायक मयुरेश वाघ यांच्या गायनावर अक्षरशः तरुणाई थिरकली.
आयोजनात हा महोत्सव अगदीच सरस ठरला. गेले तीन दिवस महिला भगिनीपासून आबालवृद्धांनी या महोत्सवाच्या माध्यमातून आनंद लुटला. यापुढे देखील अशाच प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करून सोसायटीतील नागरिकांना एकत्रित आणावे, असा मनोदय अनेकांनी व्यक्त केला, अशी माहिती आयोजक सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई संदीप काटे यांनी दिली. हा महोत्सव (दि. ३० सप्टेंबर) ते (दि. २ ऑक्टोबर) एकूण ३ दिवस चॅलेंजर पब्लिक स्कुलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. रंगीत दिव्यांची रोषणाई आणि सुमधूर संगीताच्या तालावर सहभागी स्पर्धकांसह नागरिकांनी मोठ्या जल्लोषात दांडियांचा आनंद लुटला.
या महोत्सवाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर सौ. उषाताई उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून देवीची आरती केली. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, उद्योजक संदीप काटे, निलेश काटे युवा मंचाचे अध्यक्ष निलेश काटे, आरती तुतारे, श्वेता खोरगडे, अनिता ज्ञानेश्वर काटे, गावातील ग्रामस्थ, विविध सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारितोषिकाचे मानकरी असे आहेत…
या दांडिया महोत्सवात सहभागी प्रत्येकाला बक्षीस जिंकण्याची संधी होती. त्यात उत्कृष्ठ कपल, उत्कृष्ठ नृत्य (पुरुष), उत्कृष्ठ नृत्य (महिला), उत्कृष्ठ वेशभूषा (पुरुष), उत्कृष्ठ वेशभूषा (महिला), उत्कृष्ठ बाल नृत्य (मुलगा), उत्कृष्ठ बाल नृत्य (मुलगी), उत्कृष्ठ बाल वेशभूषा (मुलगा / मुलगी) यांच्यातील सर्वोत्कृष्ठ स्पर्धकाची श्रेणीनिहाय बक्षीसासाठी निवड करण्यात आली. महिलांमध्ये बक्षिसाच्या मानकरी सौ. अंजली मालकवडे, सौ. कल्याणी, वेदश्री रासने या ठरल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button