breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

धक्कादायक! व्यवसायिक तरुणाची भर चौकात गोळ्या घालून हत्या

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भरदिवसा चौकात झालेल्या एका हत्येने दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. सुरज बहुरिया नामक कोळसा व्यवसाय करणाऱ्या युवकाची गोळ्या घालून दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. बल्लारपूर शहरातील जुना बस स्टँड भागात सुरज बहुरिया कारमध्ये बसून जाण्यासाठी निघत असताना काही युवक कार जवळ आले आणि त्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून सुरज बहुरिया यांना ठार मारले आहे. चौकात झालेल्या या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने बहुरिया याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले होते. मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.

बहुरिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालून मृतदेह रुग्णवाहिकेत टाकत रुग्णवाहिका बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या समोर उभी केलेली आहे. यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. दरम्यान, घटनास्थळी तीन रिकामी काडतूसे तर तीन भरलेल्या गोळ्या आढळून आलेल्या आहेत. चंद्रपूर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांना या हत्येनंतर सतर्क करण्यात आलेले असून बल्लारपूर शहरात बंदोबस्त वाढविण्यात येत आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलीस वेगवान तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button