यशाचं उंच शिखर गाठणारा अभिनेता म्हणजे विजय वर्मा
एकेकाळी बँक खात्यात केवळ १८ रुपये, आजच्या घडीला इंडस्ट्रीचा टॉप स्टार अभिनेता
![Yash, High, Shikhar, Actor, Vijay Verma, Bank, account, industry, top, star, actor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/vijay-varma-780x470.jpg)
मुंबई : बॉलिवूडचे अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी अभिनयक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करताना अपार कष्ट आणि मेहनत केली आहे. खिशात पैसे नसताना मेहनत करून स्वबळावर नाव कमावलं. असाच एक इंडस्ट्रीमधला अभिनेता आहे, ज्याच्या अकाउंटमध्ये एकेकाळी फक्त १८ रुपये होते, हाती काही काम नव्हतं. पण आता तो बॉलिवूडचा स्टार बनला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या अभिनेत्याबद्दल.
हलाखीच्या परिस्थितून यशाचं उंच शिखर गाठणारा हा अभिनेता म्हणजे विजय वर्मा. विजय वर्माने मिर्झापूर, डार्लिंग, लस्ट स्टोरीज यांसारख्या अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. विजय लोकप्रिय अभिनेता असून तो फॅशन मॉडेलिंगसुद्धा करतो.
विजय एका मुलाखतीमध्ये त्याच्या स्ट्रगल स्टोरी बद्दल सांगताना म्हणाला होता की, ‘मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली होती. तेव्हा माझ्याकडे काम पण नव्हतं आणि मी कामाच्या शोधात होतो. माझ्याकडे काम नसल्यामुळे मी खूप खचून गेलो होतो आणि वर्षानुवर्षे माझी तीच परिस्थिती होती. माझी परिस्थिती जेव्हा बेताची होती त्याच काळात मी डेट करत होतो. माझ्याकडे थोडे पैसे असताना मी बाहेर गेल्यावर जेव्हा बिल भरायचो तेव्हा माझ्या गर्लफ्रेंडला राग यायचा.’
पुढे विजय म्हणाला की, ‘मी निवडक भूमिका साकारतो. पण एक वेळ अशी होती जेव्हा माझ्याकडे अजिबातच पैसे नव्हते आणि जेवणाचे हाल व्हायचे. माझ्या खात्यात फक्त १८ रुपये होते. त्याचदरम्यान मला एका भूमिकेसाठी फोन आला. छोट्या पत्रकाराची भूमिका आहे. फक्त एक दिवसाचं काम आहे, तुम्हाला त्याचे ३००० रुपये मिळतील, असं मला सांगण्यात आलं. मला कधीच अशी लहान भूमिका करायची नव्हती. पण पैशाची चणचण असल्यामुळे मी ती भूमिका स्वीकारली. मी गेलो आणि शूटिंग सुरू केलं. पण माझं लक्ष लागत नव्हतं, तरीही मी भूमिका साकारली.