“अभिनेत्रींना जास्त मानधन मिळालं की, पुरुषांना त्रास होतो”, भर पुरस्कार सोहळ्यात प्रीती झिंटाने केलेलं वक्तव्य

Preity Zinta On Actress Payment : ५ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’च्या निमित्ताने आपण या पुरस्कार सोहळ्यातील काही जुन्या आणि संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला जात आहे.
‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’च्या याआधी होऊन गेलेल्या सोहळ्यातील काही खास आठवणी, प्रसंग आणि मजेशीर किस्से चर्चेत येत आहेत. असाच एक मजेशीर किस्सा २२ व्या स्क्रीन अवॉर्ड्सदरम्यान घडला होता, जेव्हा स्टेजवर प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, फराह खान व सोनाक्षी सिन्हा यांनी कपिल शर्मा आणि करण जोहरला आपल्या हजरजबाबीपणाने निरुत्तर केले होते. तेव्हा नेमके काय घडले होते? चला पाहूया…
कार्यक्रमाची सुरुवातच एका मजेदार प्रसंगाने झाली होती. करण जोहरच्या हातात एक झाडू दिला गेला होता, तेव्हा तो थोडासा नाराज होऊन म्हणाला होता, “मला हा झाडू अजिबात आवडत नाही,” म्हणजेच त्याला हे काम करायचं नाही हे स्पष्ट करायचं होतं. हे पाहून कपिल शर्मा लगेच प्रेक्षकांकडे वळून, “अरे करण, हा तर तोच झाडू आहे ना, जो लोक सकाळी घर साफ करायला वापरतात? की तुमच्यासारख्या मोठ्या लोकांकडे काही खास व्यवस्था असते?” असं म्हणाला होता. त्यावर प्रेक्षक जोरात हसले होते.
हेही वाचा – ‘महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा’; पालकमंत्री जयकुमार गोरे
यापुढे त्याने आणखी एक विधान केले होते की, पुरुषांची सहनशक्ती स्त्रियांपेक्षा जास्त असते. “पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त वेदना सहन करू शकतात”, असं म्हणत त्यानं “एखाद्या महिलेला ‘आंटी’ म्हणा, दोन मिनिटांत तिचा चेहरा इतका लाल होईल की कोणताही मेकअप तसा रंग देऊ शकणार नाही”, असं म्हटलं होतं. यावरून हे संभाषण कुठे जातंय याची कल्पना करणला होती. तो कपिलला सावध करत म्हणाला होता, “आज मुलींनी तुझं खूप काही सहन केलंय. त्यामुळे कदाचित तुला आता मारही बसू शकतो.” पण कपिल अजिबात घाबरला नाही. तो म्हणाला, “त्यांच्यात हिंमत आहे का काही करायची? इथे सगळ्यांसमोर?”
त्यानंतर स्टेजवर प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी व फराह खान आल्या. त्यांच्या हातात झाडू होते आणि चेहऱ्यावरूनच दिसत होतं की, त्यांनी सगळं ऐकलं आहे. प्रीती थेट मुद्द्यावर आली आणि कपिलला म्हणाली होती, “मी ऐकलंय की, फिल्म इंडस्ट्रीवर पुरुषांचं राज्य आहे.” त्यावर कपिल लगेच माघार घेत म्हणाला होता, “अरे, मी तर तेच म्हणत होतो. सगळीकडे महिलाच राज्य करतात.” पण प्रीतीला त्याचं उत्तर पटलं नाही. ती शांतपणे म्हणाली, “पुरुषांना कधीच कशाचं दुःख होत नाही, त्यांना फक्त तेव्हाच त्रास होतो, जेव्हा अभिनेत्रींना त्यांच्यापेक्षा जास्त मानधन मिळतं. हीच खरी शोकांतिका आहे.”





