अक्षय कुमारचा आगामी चित्रपट बेलबॉटमचा ट्रेलर रिलीज
![Trailer release of Akshay Kumar's upcoming film Bellbottom](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Bellbottom.jpg)
नवी दिल्ली – अक्षय कुमारचा आगामी चित्रपट बेलबॉटम (Bellbottom) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षयच्या बेलबॉटम चित्रपटामुळे चाहत्यांना वेगळा चित्रपट पहावयास मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनुसार अक्षय पुन्हा एकदा देशाच्या हितासाठी लढाई जिकण्यास जात असल्याचे दिसते. या चित्रपटातून देशभक्ती आणि कर्तव्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान अक्षय कुमार पुन्हा एकदा दिमाखदार अंदाजात समोर येणार आहे. बेलबॉटमचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी याला चांगलीच पसंदी दिली आहे. पूजा एंटरटेनमेंट द्वारा हा चित्रपट प्रदर्शित होणारा आहे. याचबरोबर हा चित्रपट २डी आणि ३डी या दोन्ही रुपात पेक्षकांच्या नजरेस येणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अक्षय कुमारचा हा पहिला चित्रपट आहे, तसेच हा चित्रपट थेटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.धमाकेदार टीझरने चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.याचबरोबर चाहत्यांना चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी मिळणार असल्याने याबाबत अधिक उत्सुकता असेल.
अक्षय कुमार आणि रणजीत एम तिवारी दिग्दर्शित चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांच्या समावेश आहे.वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी निर्मित ही चित्रपट असणार आहे.असीम अरोरा आणि परवेज शेख लिखित ‘बेलबॉटम’ १९ ऑगस्ट २०२१ रोजी रिलीज होणार आहे.