Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

हडपसर येथे खाजगी बसला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

पुणे | हडपसर येथे कदम बाग वस्तीलगत (सोलापूर महामार्ग) येथे एका खाजगी बसला आग लागल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून हडपसर आणि पीएमआरडीए येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आली. तब्बल वीस मिनिचे पाण्याचा फवारा करून अग्मिशमन दलाच्या दवानांनी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एका खाजगी बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आहे. त्याचवेळी जवानांनी प्रथम बसमध्ये कोणी आहे का याची खात्री करून घेतली. पाण्याचा मारा करत सुमारे वीस मिनिटांत आग पूर्ण विझवत धोका दूर केला. या घटनेत जखमी कोणी नसून या बसमधील १४ प्रवासी आणि वाहनचालक सुरक्षित आहेत. बस पूर्ण जळाल्याने प्रवाशांचे सामान आणि डिक्कीमधील एक दुचाकी देखील जळाली आहे.

हेही वाचा     –        ‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच वाहनचालक नारायण जगताप, जवान बाबा चव्हाण, अनिकेत तारु, अविनाश ढाकणे, रामदास लाड व पीएमआरडीएचे वाहनचालक संदिप शेळके, जवान लक्ष्मण मिसाळ, आकाश राठोड, सुरज इंगवले, संकेत कुंभार यांनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button