अक्षय कुमार सोबत टायगर श्रॉफ मोठ्या पडद्यावर चमकणार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा टीझर प्रदर्शित

Bade Miyan Chote Miyan : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र धमाका करण्यास सज्ज झाले आहेत. त्याच्या बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाची चर्चा आहे. निर्माते दररोज या चित्रपटाचे पोस्टर आणि अपडेट्स शेअर करत असतात, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची पातळी वाढत आहे. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हे पाहून आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बडे मियाँ छोटे मियाँमध्ये अक्षय आणि टायगर जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरूनच समजले होते की हा एक अॅक्शनपॅक चित्रपट असणार आहे. आता टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांना मजा येत आहे. अक्षयने टीझर रिलीजच्या एक दिवस आधी पोस्ट शेअर केली होती आणि सांगितले होते की हा टीझर २४ जानेवारीला सकाळी १० वाजता रिलीज होणार आहे.
हेही वाचा – पुण्यात १ लाख ७५ हजार मतदार वाढले, महिला आणि तरुण मतदारांच्या संख्येत मोठी वाढ
सध्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ जॉर्डनमध्ये त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. यामुळे ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली होती.
बडे मियाँ छोटे मियाँच्या स्टार कास्टबद्दल सांगायचे तर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ देखील यात दिसणार आहेत. तिन्ही अॅक्शन किंग एकत्र येऊन धमाका करणार आहेत. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
बडे मियाँ छोटे मियाँचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती जॅकी भगनानी यांनी केली आहे. हा चित्रपट २४ एप्रिल २०२४ रोजी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यंदाची ईद अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या नावावर असणार आहे.





