Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

#SushantSinghSuicideCase: आधी ईडी, नंतर सीबीआय, आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एन्ट्री, तिन्ही तपास यंत्रणांच्या रडारवर अभिनेत्री रिया चक्रवर्ती

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय तपासाचा गुरुवारी (27 ऑगस्ट) हा सातवा दिवस होता. मात्र, याप्रकरणी आता फक्त सीबीआयकडूनच तपास सुरु आहे, असं नाहीय. तर ईडीबरोबरच आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचीही एंट्री झालेली आहे. कारण रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगमध्ये ड्रग्जचा अँगल समोर आलेला आहे. त्यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तीन तपास यंत्रणांचा सामना करावा लागत आहे.

सुशांतच्या मृत्यूवरुन रडारवर असलेल्या रिया चक्रवर्तीच्या भोवती तीन तपास यंत्रणा आहेत. आधी ईडी नंतर सीबीआय आली आणि आता ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एंट्री झालेली आहे. ईडी तपासात रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगवरुन ड्रग्ज अँगल समोर आलेला आहे. गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याशी MD ड्रग्जबद्दल रियानं चॅटिंगही केली होती. त्यामुळे आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) टीम मुंबईत दाखल झालेली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button