ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

सनी देओलवर फसवणूक, खंडणी, बनावटगिरीचे धक्कादायक आरोप

निर्मात्याची पोलिसात धाव

मुंबई: चित्रपट निर्माते सौरव गुप्ता यांनी अभिनेता सनी देओलवर फसवणूक, खंडणी आणि बनावटगिरीचे धक्कादायक आरोप केले आहेत. या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत सौरव यांनी हे गंभीर आरोप केले. त्यांनी असे म्हटले की, सनी देओलने २०१६ मध्ये एक चित्रपट करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि त्या सिनेमाचे शूटिंग सुरू करू असे आश्वासन दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारे आश्वासन देत तो आणखी पैसे घेत राहिला, पण सिनेमा शेवटी बंद पडला. त्याचा गदर २ हा चित्रपट प्रचंड हिट झाल्यानंतर त्याने त्या चित्रपटाचे शूटिंग थांबवले आणि चित्रपट पूर्ण केला नाही, असा आरोप या निर्मात्याने केला आहे.

सौरव गुप्ता यांनी ‘एचटी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत असे म्हटले की, २०१६ मध्ये त्यांनी सनी देओलसोबत मुख्य अभिनेता म्हणून ४ कोटी रुपयांचा करार केला होता. त्यांनी असे म्हटले की, ‘आम्ही त्याला १ कोटी रुपये आगाऊ दिले होते, पण माझा चित्रपट सुरू करण्याऐवजी त्याने पोस्टर बॉईज (२०१७) साठी शूट करणे पसंत केले. तो माझ्याकडे आणखी पैसे मागत राहिला आणि आतापर्यंत माझे २.५५ कोटी सनीकडे आहेत.’

सनी देओलने २०२३ मध्ये त्यांच्या कंपनीसोबत बनावट करार केल्याचा आरोपही चित्रपट निर्मात्याने केला. ते म्हणाले, ‘जेव्हा आम्ही करार वाचला तेव्हा आमच्या निदर्शनास आले की, मधले पान बदलले होते, ज्यामध्ये मानधन ४ कोटींवरून ८ कोटी रुपये केले होते आणि नफा वाढवून २ कोटी केलेला.’

आणखी एका चित्रपट निर्मात्याने पाठिंबा दिला

‘जानवर’ (१९९९) आणि ‘अंदाज’ (२००३) या सिनेमांचे निर्माते सुनील दर्शन यांनीही या पत्रकार परिषदेत सौरव यांच्या वक्तव्यांना समर्थन दिले. त्यांनी अशाच परिस्थितीचा सामना सनीसोबत केल्याचे त्यांचे म्हणणे होते. ते म्हणाले की, ‘सनी देओलने माझ्या ‘अजय’ (१९९६) चित्रपटाचे हक्क परदेशी वितरणासाठी विकत घेतले आणि फक्त किरकोळ पैसे दिले. बाकीचे पैसे कधीच दिले नाहीत. नंतर सनीने मला त्याच्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करण्याची विनंती केली आणि ‘माझ्यावर विश्वास ठेवा, मला मदत करा’ असे सांगितले आणि मला पुन्हा पैसे देण्यास सांगितले.’

सनी देओलविरोधात तक्रार दाखल

सौरव सांगतात की त्यांनी सनी देओलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी असे म्हटले की, ‘पोलिसांनी सनी देओलला 30 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. ज्या दिवशी तो हजर होणार होता त्यादिवशी तो शहराबाहेर असल्याचे पत्र त्यांच्या कार्यालयाने पाठवले. आम्ही सनी देओलची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button