मराठी अभिनेता शशांक केतकर आणि पत्नी प्रियांका यांना कन्यारत्न प्राप्त
लाडक्या लेकीच नावही फार खास ठेवलं
![Shashank Ketkar, wife, Priyanka, Kanyaratna, recipient, beloved son, name, special,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/ketakar-780x470.jpg)
मुंबई : मराठी, बॉलिवूड आणि अगदी टॉलिवूडमध्येही गेल्या काही महिन्यांपासून लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. तेसच अनेकांच्या बाळाच्या आगमनाची गोड बातम्याही समोर येत आहेत. अशीच एक गोड बातमी एका मराठी अभिनेत्यानेही दिली आहे. हा लाडका अभिनेता म्हणजे शशांक केतकर.
शशांक केतकरला कन्यारत्न
अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याने सर्वांना लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान शशांकने आता एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दुसरी आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे शशांकला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत मुलगी झाल्याची गोड बातमी
काही दिवसापूर्वी शंशाकने सोशल मीडियावर पोस्ट करत बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती. शशांक आणि पत्नी प्रियांका यांनी खास मॅटर्निटी फोटोशूट करत आई-बाबा होणार असल्याचा आनंद त्यांनी सगळ्यांसोबत शेअर केला होता.
हेही वाचा : सुजाण नागरिक होण्याकरता भूगोलाची जाण आवश्यक; डॉ. विजय खरे
दरम्यान आता शशांक केतकरला एक गोड मुलगी झाली आहे. त्याने व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘आता खऱ्या अर्थानं कुटुंब पूर्ण झालं. घरात लक्ष्मी आली.’ एवढंच नाही तर शशांकने लेकीचं बारसंही केलं असून नावही ठेवलं आहे.
लेकीच नावही ठेवलं आहे फारच खास
शशांकने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. याच व्हिडिओतून त्याने लेकीचं नावही जाहीर केलं आहे. शशांकने त्याच्या लाडक्या लेकीचं नाव राधा असं ठेवलं आहे. त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच
शशांकने हा व्हिडीओ शेअर करत “खऱ्या अर्थाने आता कुटुंब पूर्ण झालं. घरी लक्ष्मी आली”, म्हटलं आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरीही शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने एक फोटो टाकला आहे. या फोटोला त्याने “हम दो हमारे दो” असं कॅप्शनही दिलं आहे.
शशांकच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव
शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. होणार सून मी ह्या घरची मालिकेतून शशांकला प्रसिद्धी मिळाली. त्याने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. शशांकने 2017 साली प्रियांका ढवळेसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना ऋग्वेद हा मुलगा आहे. आता मुलगी झाल्याने शशांक आणि प्रियांका आनंदी आहेत. दरम्यान शंशाकच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कौतूकाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे. अनेक मराठी कलाकरांनी त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.