अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

देगावात प.पू. सद्‌गुरु टेंबे स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य आनंद उत्सव सोहळा !

प.पू. सद्‌गुरु टेंबे स्वामी महाराज यांचे प्रवचन ऐकण्यास असंख्य भाविकांची गर्दी

श्रीक्षेत्र नारायणपूर, पुणे: प.पू. सद्‌गुरु टेंबे स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत, देगाव येथे मोठ्या उत्साहात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भव्य आनंद उत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त देगावमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

देगाव ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी पालखी सोहळ्यानिमित्त हा आनंद उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. प.पू. सद्‌गुरु टेंबे स्वामी महाराज (श्री क्षेत्र नारायणपूर) व श्री. भरतनाना क्षिरसागर (श्री क्षेत्र नारायणपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला.

हेही वाचा  : सुजाण नागरिक होण्याकरता भूगोलाची जाण आवश्यक; डॉ. विजय खरे

दुपारी ४ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत चालेल्या या कार्यक्रमास, प.पू. सद्‌गुरु टेंबे स्वामी महाराज यांचे प्रवचन ऐकण्यास असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात भाविकांना महाप्रसाद वाटप करून, कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिदास दिल्यामुळे ग्रामस्थ मंडळ देगाव यांच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button