Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
‘काही अदंज, फ्रीज की सुटकेस?’; स्वारा भास्कर-फहाद अहमदच्या फोटोवर साध्वी प्राचीचे ट्वीट
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदशी केलं लग्न
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदशी लग्न केलं आहे. कोर्ट मॅरेजनंतर स्वरा भास्करने हळदी-मेहंदी, कव्वाली नाईट आणि रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन केलं. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा स्वरावर निशाणा साधला आहे.
स्वराने पती फहाद अहमदबरोबर एक फोटो ट्वीट केला आहे. तो फोटो कव्वाली नाईटमधील आहे. या फोटोमध्ये स्वरा व फहादने गडद हिरव्या रंगाचे ट्रॅडिशनल कपडे परिधान केले आहेत. स्वाराने या फोटोला ‘हॅलो शौहर’ असं कॅप्शन दिलं आहे.
स्वरा भास्करच्या या ट्वीट वरून साध्वी प्राची यांनी ‘काही अदंज? फ्रीज की सुटकेस’ असं ट्वीट केलं आहे. पण हे ट्वीट नेटकऱ्यांना फारस रूचलेलं दिसत नाही. नेटकऱ्यांनी या ट्वीटवरून साध्वी प्राची यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.