Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

KING च्या सेटवरुन आणखी फोटो व्हायरल! नवीन फोटोंमध्ये अभिषेक बच्चनचा दमदार लूक समोर

Abhishek Bachchan : शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित किंग चित्रपटाची सध्या चर्चा आहे. या चित्रपटात अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेथा अभिषेक बच्चनही या चित्रपटात विशेष  भूमिकेत दिसणार असून त्याचा सेटवरील लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

किंग हा एक अॅक्शन चित्रपट असून, याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करताना अभिषेक दिसणार आहे. ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सोशल मीडियावर जो अभिषेकचा लूक व्हायरल झाला आहे, त्यावरुन तो ग्रे-शेड म्हणजेच नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचा अंदाज चाहत्यांकडून बांधला जात आहे.

या लूकमुळे त्याच्या ॲक्शन मोडबद्दलची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे. त्यांचा अॅक्शन अवतारातील दमदार लूक सगळ्यांचा प्रभावित करत आहे.

हेही वाचा –  स्थायी समितीत पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व सुरक्षेसह विविध प्रस्तावांना मंजुरी

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचे बीटीएस (पडद्यामागील) फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता ‘किंग’च्या सेटवरील काही नवीन फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये अभिषेक बच्चनची झलक दिसत आहे.

हे फोटो ट्विटरवरील अनेक फॅन अकाऊंट्सवर शेअर करण्यात आले आहेत. एका फोटोमध्ये, अभिषेक एका वाहनावर उभा असलेला दिसत असून त्याच्या अंगावर काळे जाकीट आणि हातात बंदूक असल्याचे दिसते.

या फोटोंवरून असा अंदाज लावला जात आहे की अभिषेक बच्चन ‘किंग’मध्ये शाहरुख खानच्या विरोधात एका शक्तिशाली खलनायकाची भूमिका साकारू शकतो.

या बिग-बजेट चित्रपटात सुहाना खान, दीपिका पदुकोण, जयदीप अहलावत आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

यापूर्वी, जेव्हा दीपिका आणि शाहरुख ‘किंग’च्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेत होते, तेव्हा शूटिंगचे अनेक पडद्यामागील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

‘किंग’ या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान एका क्रूर मारेकऱ्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button